मी मराठा प्रतिष्ठान
मराठा .. ही ओळख आहे लढवय्या मर्दांची आणि धरतीपुत्रांची ! मराठा ही महाराष्ट्रातील एक उच्चवर्णीय क्षत्रिय जात आहे. मराठा ही लढाऊ जात आहे. मराठा साम्राज्याचा लढा स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेसाठी होता. या लढ्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. मराठा या शब्दाचे संस्कृत रूप महाराष्ट्र आहे, ज्याचा अर्थ आहे 'मोठे राष्ट्र' आणि ज्यांचे राज्य मोठे आहे ते मराठे, मरहट्ट, महारठ्ठ, महारथ. या सर्व संज्ञाचा अर्थ प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली, धुरंदर, लढवैय्ये असा होता. ही सर्व विशेषणे शौर्यवान पुरुषांना लावली जात असत. शस्त्रशास्त्र विद्येत पारंगत आणि प्रवीण होऊन जो एकटा क्षत्रिय दहा हजार योध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरास मरहट्ट -महारथी असे म्हणतात, असे इतिहास तज्ज्ञ डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी सांगितले आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की संस्कृत शब्द 'महाराष्ट्र' या वरून मरहट्ट, महारथी, मराठा हा शब्द उदयास आला असावा.


